E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
ट्रॅक्टरच्या धडकेत युवकाचा मृत्यू
Wrutuja pandharpure
26 May 2025
पुणे
: भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सिद्धार्थ हुल्लाजी घावटे (वय १९, रा. साडेसतरानळी, हडपसर) असे अपघातात मृत्यू झालेल्या सहप्रवासी युवकाचे नाव आहे. याबाबत त्याचा मित्र सूरज राठोड (वय २७, रा. आव्हाळवाडी, वाघोली, नगर रस्ता) याने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार सूरज आणि त्याचा सहप्रवासी मित्र सिद्धार्थ हे दोघेही नगर रस्त्यावरील खराडी भागातून गुरुवारी (२२ मे) रात्री साडेदहाच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी खराडी बायपास चौकात दुचाकीला पाठीमागून भरधाव ट्रॅक्टरने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी सिद्धार्थ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबतचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चेतन भोसले करत आहेत.
रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू
आठवडाभरात शहरात वेगवेगळ्या भागांमध्ये अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. कोंढवा भागात भरधाव मोटारीच्या धडकेत निवृत्ती बाजीराव किसवे (वय १३, रा. कोंढवा) याचा रविवारी (१८ मे) सायंकाळी मृत्यू झाला होता. शनिवारी (१७ मे) दुपारी डंपरच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरील सहप्रवासी शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना खराडी भागात घडली आहे. अपघातात अंशुमन अनुपमकुमार गायकवाड (वय ११, रा. केशवननगर, मुंढवा) याचा मृत्यू झाला. त्यानंतर सोमवारी (१९ मे) रात्री कोथरूडमध्ये भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहप्रवासी अबीर पानसे या बारा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. नगर रस्ता आणि येरवडा भागात दोन दिवसांपूर्वी वेगवेगळ्या अपघातांत पादचारी दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला होता.
Related
Articles
नीलेश चव्हाण याचा कोठडीतील मुक्काम वाढला
04 Jun 2025
नीलेश चव्हाणने हगवणे कुटुंबाला गुन्हा करण्यासाठी दिली चिथावणी
04 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
रोहण बोपन्ना-अॅडम यांचे आव्हान संपुष्टात
02 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
नीलेश चव्हाण याचा कोठडीतील मुक्काम वाढला
04 Jun 2025
नीलेश चव्हाणने हगवणे कुटुंबाला गुन्हा करण्यासाठी दिली चिथावणी
04 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
रोहण बोपन्ना-अॅडम यांचे आव्हान संपुष्टात
02 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
नीलेश चव्हाण याचा कोठडीतील मुक्काम वाढला
04 Jun 2025
नीलेश चव्हाणने हगवणे कुटुंबाला गुन्हा करण्यासाठी दिली चिथावणी
04 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
रोहण बोपन्ना-अॅडम यांचे आव्हान संपुष्टात
02 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
नीलेश चव्हाण याचा कोठडीतील मुक्काम वाढला
04 Jun 2025
नीलेश चव्हाणने हगवणे कुटुंबाला गुन्हा करण्यासाठी दिली चिथावणी
04 Jun 2025
रायगडावर आढळले ऐतिहासिक ‘यंत्रराज’
03 Jun 2025
आमदाराच्या घरात शिरणार्यास अटक
31 May 2025
रोहण बोपन्ना-अॅडम यांचे आव्हान संपुष्टात
02 Jun 2025
जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
विमा महामंडळाचा विक्रम
6
पती आणि सासू येरवडा कारागृहात